Thursday, 25 July 2013

दुनियादारी - इस्टमनकलर लवस्टोरी

duniyadari
नमस्कार मित्रानो ,
हा ब्लॉग मी आज सुरु करतोय, याची प्रेरणा म्हणजे मी नुकताच बघितलेला दुनियादारी - मराठी सिनेमा. आज याची सुरुआत याच सिनेमावर थोडस लिहून करतोय.यात काहीच वाद नाही संजय जाधव याने त्याचा स्वप्नातील एक सिनेमा बनवला, पण त्याचा या स्वप्नात स्वप्नील जोशी , अंकुश चौधरी , सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, उर्मिला कानिटकर, सुशांत शेलार, रिचा परियल्लि आणि संपूर्ण दुनियदारी टीमने एक स्वप्न रंगवले आणि तेच स्वप्न या सिनेमाचा यशाने पूर्ण झाले.

स्वप्नील जोशीने श्रेयसचा व्यक्तिरेखेला स्वतःचा अभिनयाने जो न्याय दिलाय तो दुसरा कोणताही अभिनेता देऊ शकला नसता. DSP ची भूमिका तर अंकुश ने एकदम वंटास निभावली आहेना भाऊ. सई हि मराठीतील एक सुंदर अभिनेत्री आहे, जास्तीत जास्त लोक कदाचित फक्त तिचा दिसण्याला वाव देत असतील पण तीने तिचा अभिनयाने शिरीनचा character ला चार चांद लावले. मिनू म्हणजे उर्मिला कानिटकर नकार माहित असून प्रेम करन कदाचित तुझा कडून शिकाव असाच वाटल सिनेमा बघताना. जितेंद्र जोशीने उत्तम खलनायक साकारावा, तो हि अगदी अलीकडे तुकाराम पडद्यावर सादर केल्या नंतर काही शिकण्यासारख आहे त्याचा कडून नवोदित कलाकारांना. रिचा ने अल्हड सुरेखा मस्त सांभाळी आहे. सुशांत, सस्ती चीझो का शौक हम भी नाही रखते, वेळ कमी होता तुझाकडे पण त्यातहि जबरदस्त अभिनय केलास.

संपूर्ण टीम दुनियादारीने मनापासून काम केले आहे. या सिनेमाचे promotion खूप झाले facebook आणि twitter या social सीतेस वर झालेले promotions आणि दुनियादारी या कादंबरीची लोकप्रीयता यांनीही हातभार लावला सिनेमा superhit व्हायला. हि माझी एक सुरुवात आहे. या पुढे पण लिहित राहीन. दुनियादारी विषयाची कमी भासणार नाही मला हे नक्की.