Monday 4 August 2014

तुझा शिवाय असाच झिजत राहणार

बरेच दिवसांनी आज वाटल काही तरी सुचतंय
सुचतंय तर लिहाव असा विचार मनात शिजतोय

वयाची सत्तावीस वर्ष कधी संपली कळलीच नाहीत
त्यात किती सुख अनं किती दुख पाहिली हे कोणाला माहीत

माझं आयुष्य मी जगलो
मी पुरलो त्यातून पण उरलो

माणसे जवळ आली आणि सोडून गेली
काही मनात राहीली आणि काही आठवणीत रुजली

एक माणुस जवळ आलं मनात राहिल
मनात राहता राहता शरीराचा श्वास बनल

पण त्याने साथ सोडली अन मन बेजार रान झाल
श्वासा शिवाय पण गुदमरत जगता येत हे मला कळून आल

आता काय शरीरात जागेवर काहीच नाही
ना मन, ना हृदय, ना श्वास
तरी घरचाना लग्नाची घाई

आता जगण भाग आहे मला, मी जगत राहणार
तुझा शिवाय असाच झिजत राहणार

1 comment:

  1. साथ सुटली आणि भाग्य बदलले... सारं काही मनाविरुद्ध घडले... काही प्रश्न देखील मनाला पडले... चूक मोठी झाली हे सुद्धा कळले!!!

    ReplyDelete