Monday, 4 August 2014

नियतीला तिचे खेळ खेळायचे होते

स्वप्न रंगून पाहीली,
त्यात हरवून पाहिले,

डाव मांडून पहिला,
त्यात रमून पाहिले,

जीव लावून पाहिला,
प्रेम करून पहिले,

डाव मोडायचा होता,
स्वप्न तुटायची होती,
हि घडी आयुष्याला पडायची होती.

हात सुटायचा होता,
आश्रू गळायचे होते,
नियतीला तिचे खेळ खेळायचे होते.

No comments:

Post a Comment